Home अकोले पिचड भांगरे गटात राडा, इतके टक्के मतदान, आज निकाल

पिचड भांगरे गटात राडा, इतके टक्के मतदान, आज निकाल

Agasti  Sugar Factory Election: शेंडी मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचे निदर्शनास आल्यावर दोन गट समोर येत बाचाबाची.

Election Rada in Pichad and Bhangare group, so much Agasti voting percentage

अकोले: अगस्ती कारखाना निवडणुकीसाठी शेंडी मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचे निदर्शनास आल्यावर दोन गट समोर येत बाचाबाची व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी काल दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास शेंडी येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान प्रकरणी माजी मंत्री मधुकरराव पिचड,वैभव पिचड व जि.प.माजी अध्यक्ष अशोक भागरे, जिल्हा बँक संचालक अमित भांगरे हे दोन्ही गट आमने सामने आले व नंतर झालेल्या बाचाबाचीमुळे तणाव निर्माण झाला व त्यानंतर कार्यकर्ते नेते एकमेकांवर धावल्याने एकच राडा झाला. दरम्यान पोलिसांसमोरच ही सर्व घटना सुरू होती.

शेंडी मतदान केंद्रावर एका मयत महिलेच्या नावाने बोगस मतदान झाल्याने मोठा तणाव शेंडी मतदान केंद्रावर पहायला मिळाला, शेणित येथिल मयत चंद्राबाई बुधा डामसे तसेच चिचोंडी येथील सूर्यकांत बांगर असे दोन मतदान बोगस झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, बोगस मतदान सुरू असल्याचे माजी आमदार वैभव पिचड, मधुकर पिचड यांना समजताच पिचड हे शेंडी मतदान केंद्रावर दाखल झाल्यानंतर अधिकार्‍यांशी चर्चा सुरु असतांना अशोक भांगरे, अमित भांगरे यांच्यात आणि पिचड यांच्या शाब्दिक चकमक झाली, यावेळी पोलिसांनी सर्वांना शांत केले, मात्र अजूनही शेंडी गावातील मतदान केंद्रावर तनाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.दुपारी 3 वाजणेच्या सुमारस शेतकरी विकास मंडळ चे कार्यकर्त्यांनी मतदान अधिकारी याना एक निवेदन दिले ज्या मध्ये त्यानी शेंडी केंद्रावर बोगस मतदान होऊ शकते याबाबद लेखी तक्रार देत .सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.

हे निवेदन देऊनही शेणित येथील मयत चंद्राबाई बुधा डामसे तसेच चिंचोंडी येथील सुर्यंकांत बांगर असे दोन मतदान बोगस झाल्याची प्राथमिक माहिती समोर त्यांच्या समोर आल्या वर त्यांनी याची शहानीशा केली. यानंतर हा प्रकार समोर आल्यावर त्यानी तातडीने चौकशीची मागणी करीत केंद्रातच ठिय्या आंदोलन केले.यामध्ये भरत घाणे, डॉ.आनंत घाणे, सुनिल सारुक्ते ,विजय भांगरे, सोडनर आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता. ही बाब माजी आमदार वैभव पिचड याना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनीही तातडीने या प्रकरणाची चौकशीची मागणी केली. दरम्यान कार्यकर्ते केंद्रावर जमू लागले.जस जशी गर्दी वाढत होती.हे लक्षात येताच पोलिस देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले.

अधिकारी पोलिस व वैभव पिचड यांच्या त चांगलीच चकमक झाली.थोड्याच वेळात माजी मंत्री मधुकरराव पिचड देखील दाखल झाले.अधिकारी व यांच्यात चर्चा सुरु असताना जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे व जिल्हा बँक संचालक अमित भांगरे आणि त्यांचे कार्यकर्ते हेही केंद्रावर आले.त्यानी थेट या कार्यकर्त्यांना येथून निघुन जा म्हटल्यावर उपस्थित पिचड समर्थक आक्रमक झाले.तेव्हा काही कार्यकर्ते व भांगरे यांच्यात चांगलीच चकमक झाली.त्यामूळे वातवरणात तणाव निर्माण झाला.पोलिस मध्यस्थी करत होते. परंतु पिचड समर्थक यांच्यासह मधुकरराव पिचड हेही आक्रमक झाले. त्यांनी ही मला अटक करा अशी भुमिका घेतल्याने तणाव आणखी वाढला.

कार्यकर्ते एकमेकांवर धाऊ लागले.हा सर्व राडा सुरु अस्ताना उपस्थीत पत्रकार व पोलिस यांच्यातही बाचा बाची झाली.पिचड यानी अनेक आक्षेप यावेळी नोंदवले अधिकारी पोलिस याना चांगलेच धारेवर धरले.भांगरे यानी बोगस मतदानाची चौकशी करा पन उर्वरित मतदान होऊ द्या.अशी मागणी केली.ज्या महिलेने मयत महिलेच्या नावावर बोगस मतदान केले ती महिला देखील यावेळी उपस्थीत होती.दरम्यान भांगरे यानी शेवटी तेथून जाने पसंद केले.पन जाताना त्यांच्या समर्थकानी घोषना देत ते निघाले असता पिचड समर्थक यानी ही घोषना दयाला सुरवात केल्या वर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला.

दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी.पुरी घटना स्थळी दाखल झाले .त्यानी घटना समजाऊन घेत या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन यातील दोषि अधिकार्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी त्यानी दिल्यावर वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.परंतु या केंद्राची च नव्हे तर संपूर्ण निवडणूक च रद्द करा अशी मागणी पिचड यानी लाऊन धरली.लेखी आश्वासना नंतर मतदान यंत्र सील करण्यात आले.

दरम्यान या घटने नंतर आ.डॉ.किरण लहामटे ,जिल्हा बँक संचालक सिताराम पाटील गायकर यानी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान झाले असेल तर याची जरुर चौकशी झाली पाहिजे. परंतु निवडणूकच रद्द करा ही पिचड यांची भुमिका चुकिची असून तालुक्यला अजुन किती दिवस वेठीस धरायचे हा खरा प्रश्न असल्याचे लहामटे म्हणाले.

अगस्ती कारखाना निवडणुकीत 85 टक्के मतदान झाले.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काल रविवारी एकूण 8142 मतदारां पैकी 7116 इतके 87.39 टक्के विक्रमी मतदान झाले असून निवडणूक रिंगणातील 45 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शेंडी येथे बोगस मतदानाच्या तक्रारीमुळे निर्माण झालेला तणाव वगळता अन्य मतदान केंद्रांत शांततेत मतदान पार पडले.

अकोले तालुक्यात एकुण 9 केंद्रावर मतदान झाले. मतदानाची टक्केवारी पहाता विक्रमी 87.39 टक्के इतके मतदान झाले.माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ तर त्यांच्या विरोधात आ.डॉ.किरण लहामटे व जिल्हा बँक संचालक सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृध्दी मंडळ यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. आज सकाळी अगस्ती महाविद्यालय येथे मतमोजणीला सुरवात होईल.

काल झालेल्या मतदानात राजुर केंद्रावर 813 पैकी 637 (78.35 टक्के) मतदारांनी मतदान केले. तर अकोले केंद्र 2090 पैकी 2066 (90.21 टक्के), इंदौरी केंद्र -1498 पैकी 1290 (86.11टक्के), शेंडी केंद्र- 731 पैकी 577 (78.93 टक्के), कोहने केंद्र – 413 पैकी 329 (79.66 टक्के), धामणगावपाट केंद्र – 350 पैकी 319 (91.14 टक्के), कोतुळ केंद्र -906 पैकी 747 (82.45 टक्के), देवठाण केंद्र – 818 पैकी 752 (91.93 टक्के), समशेरपूर केंद्र -523 पैकी 399 (79.29 टक्के) आणि बिगर उत्पादक संस्था 50 पैकी 49 (98 टक्के)असे एकुण मतदान झाले आहे.

जी.जी.पुरी (निवडणूक निर्णय अधिकारी) शेंडी मतदान केंद्रावर झालेल्या बोगस मतदानाबाबत झोनल अधिकारी संबंधित व्यक्तींवर पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदविणार आहेत. तसेच जे मतदान केंद्र अधिकारी यांच्या उपस्थितीत बोगस मतदान झाले त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. फेर मतदानाबाबत न्यायालयात जाण्यासाठी शेतकरी विकास मंडळाला कागदपत्रे दिली जातील. मात्र न्यायालयाच्या आदेशाने मतदान प्रक्रिया झाली असून सोमवारी अकोले येथे मतदान मोजणी होणार आहे.

Web Title: Election Rada in Pichad and Bhangare group, so much Agasti voting percentage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here