Home पुणे पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; स्टॉल आगीत जळून खाक

पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; स्टॉल आगीत जळून खाक

Pune Fire: हडपसरमधील  हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे भाजी मंडईला आग लागल्याची घटना, 90 स्टॉल आणि सर्व भाजीपाला व इतर साहित्य व दोन टेम्पोंचे नुकसान.

fire at vegetable market in Pune The stall was gutted by fire

पुणे: पुण्यातून भाजी मंडई ला भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास हडपसरमधील  हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे भाजी मंडईला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठं नुकसान झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

जवळपास 90 स्टॉल आणि सर्व भाजीपाला व इतर साहित्य व दोन टेम्पोंचे नुकसान झालंय. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमाराच एकच गोंधळ उडाल्याचं समोर आलं होतं. आसपासच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. तर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

Web Title: fire at vegetable market in Pune The stall was gutted by fire

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here