Home संगमनेर संगमनेर: गणपती विसर्जनावेळी मामा भाच्यासह चार जण पाण्यात बुडाले

संगमनेर: गणपती विसर्जनावेळी मामा भाच्यासह चार जण पाण्यात बुडाले

Sangamner News: Four Drowned गढूळ पाणी व वेगवान प्रवाह यामुळे हे चौघेही बुडत असल्याचे लक्षात येताच.

Four people drowned, including maternal uncle

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे गणपती विसर्जनासाठी गेलेला भाचा बुडत असल्याचे पाहून त्याला वाचावण्यासाठी दोन मामा व त्याच्या मित्रांनी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने वाहून चाललेल्या या चार ही तरुणाचे दैव बलवत्तर असल्याने त्या ठिकाणी असलेल्या इतर तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे या चौघांना पाण्यातून बाहेर काढून वाचवण्यात यश आले आहे.

शुक्रवारी दुपारनतंर चणेगाव येथील प्रवरानदी पात्रात गणपती विसर्जनसाठी परिसरातील नागरीक घरगुती गणपती तसेच गणेश मंडळाचे गणपती येत होते. सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास गणपती विसर्जन सुरु असताना गौरव वडीतके हा तरुण पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात बुडायला लागला होता. यावेळी आपला भाचा गौरव हा बुडत असल्याचे पाहून जीवाची पर्वा न करता मामा मयुर दिलिप शेळके व बाळासाहेब चिमाजी शेळके तसेच त्यांचा मित्र योगेश उत्तम साळुंखे याने पाण्यात उडी घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

मात्र गढूळ पाणी व वेगवान प्रवाह यामुळे हे चौघेही बुडत असल्याचे लक्षात येताच मेजर सचिन शिवाजी बर्डे, विकास सोनवणे व कैलास दुकळे यांनी प्रसंगसावधान दाखवून पाण्यात उड्या घेत शोधाशोध करून या तरुणांना भागवत साळुंखे, सोमनाथ ढमक, उत्तम साळुंखे, लहानू खेमनर, लक्ष्मण आहेर, पुंजा राजणार, बाळासाहेब पावडे, शंकर गेणू खेमनर, शंकर आहेर आदिसह तेथे उपस्थित असलेल्या गणेश मंडळातील तरुणांच्या मदतीने पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेत या तरुणांना तात्काळ विठ्ठलदास बालकिसन आसावा व प्रतिक शंकर खेमनर हे आपल्या वाहनातून सोनगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी घेऊन गेले. पुढील उपचारासाठी या चौघांना लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Four people drowned, including maternal uncle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here