Home अमरावती Accident: मेळघाटात चार चाकीचा भीषण अपघात, एक ठार, १५ जखमी

Accident: मेळघाटात चार चाकीचा भीषण अपघात, एक ठार, १५ जखमी

Amravati Accident News: सुरक्षा भिंतीवरून गाडी खाली कोसळली. एक ठार, १५ जखमी.

Four wheeler accident in Melghat, one killed, 15 injured

अमरावती: अमरावतीच्या मेळघाटात एका चार चाकी वाहनाचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक जण ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी की,  मेळघाटातील टेम्ब्रूसोडा जवळ एका वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळले. त्यावेळी वाहनातील लोकांनी  वाचवा वाचवा अशी मदत मागितली. यावेळी इथून जाणा-या वाहनांनी पोलिसांना माहिती दिली.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच १५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात सुरेश जामुनकर (वय ३५ रा आढाव ,कुलंगणा) येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Four wheeler accident in Melghat, one killed, 15 injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here