Home संगमनेर Crime: संगमनेर: ग्रामसेवकास धक्काबुक्की, उपसरपंचावर गुन्हा दाखल

Crime: संगमनेर: ग्रामसेवकास धक्काबुक्की, उपसरपंचावर गुन्हा दाखल

Gramsevak pushed, crime case filed against sub-panch

Sangamner Crime | संगमनेर: पाणी टँकरचा प्रस्ताव तयार करत असताना तो ओढून फाडून टाकला. अरेरावीची भाषा करून ग्रामसेवकास धक्काबुक्की केल्याने संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील उपसरपंचाविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला.

सारोळे पठारचे ग्रामसेवक अजित वसंत घुले (वय ५३, रा. वरुडी पठार ह. मुक्काम गुंजाळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे ( रा. सारोळे पठार) यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सारोळे पठारचे ग्रामसेवक अजित घुले गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असताना येथील उपसरपंच प्रशांत फटांगरे तेथे गेले. त्यांनी ग्रामसेवक घुले यांना अरेरावीची भाषा केली. घुले हे पाणी टँकरचा प्रस्ताव करत असताना उपसरपंच फटांगरे यांनी प्रस्ताव ओढून घेत फाडून टाकला. ग्रामसेवक घुले यांना धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते हे करीत आहेत.

Web Title: Gramsevak pushed, crime case filed against sub-panch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here