अहमदनगर: हॉटेल मालकावर सशस्त्र गुंडांनी कोयते व तलवारीने हल्ला
Breaking News | Ahmednagar: सुरुवातीला जेवण देण्यास नकार दिला व नंतर दिलेले जेवण खराब असल्याचे म्हणत पाच सशस्त्र गुंडांनी कोयते व तलवारीने हल्ला केल्याची घटना.
पारनेर: सुरुवातीला जेवण देण्यास नकार दिला व नंतर दिलेले जेवण खराब असल्याचे म्हणत पाच सशस्त्र गुंडांनी कोयते व तलवारीने केलेल्या हल्ल्यात निघोज (पारनेर) येथील जत्रा हॉटेलचे मालक प्रवीण भुकन गंभीर जखमी झाले. मंगळवारी (दि.२) रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पारनेर पोलिसांनी या प्रकरणी आदिनाथ मच्छिद्र पठारे, धोंड्या ऊर्फ धोंडीभाऊ महादू जाधव, सोन्या ऊर्फ प्रथमेश विजय सोनवणे, विशाल खंडू पठारे, शंकर केरू पठारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी भुकन यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भुकन यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचे भाऊ गणेश भुकन, भाचा ओंकार रसाळ, हॉटेल कामगार अजय व सुजान यांनाही या हल्ल्यात मुका मार लागला. आरोपींनी हॉटेलममध्ये मोडतोडही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी निघोज, निघोज परिसरातील पठारवाडी, सुलाखेवस्ती (निघोज कुंड) येथील रहिवासी आहेत. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाल्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले. आरोपींपैकी धोंड्या जाधव हा निरगुडसर (आंबेगाव, पुणे) येथील बँकेवरील दरोड्यातील आरोपी असून, सध्या तो जामिनावर आहे. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
Web Title: hotel owner was attacked by armed goons with knives and swords
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study