Home नाशिक हॉटेलमध्ये देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश; 5 जणांसह पीडित महिला पोलिसांच्या ताब्यात

हॉटेलमध्ये देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश; 5 जणांसह पीडित महिला पोलिसांच्या ताब्यात

Prostitution Racket:  महिला बांगलादेशी देहविक्रय करवून घेतल्याची घटना.

Hotel prostitution racket busted Victim women along with 5 others in police custody

नांदगाव: मालेगाव रस्त्यावरील नाग्यासाक्या धरणानजीक ‘गोल्डन पॅलेस’ या ढाबावजा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रय व्यवसायावर नाशिकच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकत रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

या कारवाईत पोलिसांनी हॉटेलचालकासह अन्य पाच पुरुषांना ताब्यात घेतले आहे. नाग्यासाक्या धरणाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये पाच ते सहा वर्षांपासून खुलेआम देहविक्रयचा व्यवसाय सुरू होता. जुलै २०२३ मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने कारवाई करीत रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

पण ते पुन्हा सुरूच होते, हे आजच्या कारवाईने स्पष्ट झाले. दोन ते अडीच महिन्यांतच पुन्हा देहविक्रयच्या या रॅकेटने जणू काहीच झाले नाही, अशा समजुतीने डोके वर काढले होते. या हॉटेलमध्ये पुन्हा देहविक्रयचा व्यवसाय (Prostitution Business) सुरू असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पीडित महिलेसोबत सौदा केला. त्यानंतर याठिकाणी छापा टाकत देहविक्रयचे रॅकेट उघडकीस आणले.

पोलिसांनी कुंटणखाना चालविणारा मोहंमद अख्तार शमीम सोनावला (रा. मनमाड) याच्यासह सचिन इंगळे, ग्यानेश्वर मोरे, संदीप जाधव, संजय मेगनर यांना अटक केली. पीडित महिला बांगलादेशी असून, त्यांना याठिकाणी आणून देहविक्रय करवून घेतले जात होते. पोलिसांनी संशयितांचे मोबाईल आणि इतर ऐवज जप्त केला.

Web Title: Hotel prostitution racket busted Victim women along with 5 others in police custody

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here