Home अकोले अकोले तालुक्यात घर आगीत जळून खाक, संसारोपयोगी साहित्य व दोन शेळ्या जळून...

अकोले तालुक्यात घर आगीत जळून खाक, संसारोपयोगी साहित्य व दोन शेळ्या जळून खाक

Akole Home Fire:  घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य व दोन शेळ्या जळून खाक झाल्या.

House gutted in fire in Akole taluka

अकोले:  अकोले तालुक्यातील पैठण येथील बुळेवाडीत शशिकांत सखाराम सावळे यांच्या कुडाच्या भिंती असलेल्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य व दोन शेळ्या जळून खाक झाल्या. सुदैवाने तेरा वर्षाचा मुलगा या घटनेत बचावला.

येथील शशिकांत सावळे यांची पत्नी भाऊबीजेसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या घराला आग लागली. येथे त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा ओंकार होता. आग विझविण्यासाठी त्याला काय करावे, हे सुचेना. शेवटी घाबरलेल्या स्थितीत त्याने घराबाहेर पडत मदतीसाठी धावा केला. मात्र, गॅसटाकीचा स्फोट होवून कुडाच्या भिंती असलेले घर आणि दोन शेळ्या जळून खाक झाल्या. यामध्ये त्यांचे संसारोपयोगी साहित्य, धान्य, कागदपत्रे यांचा समावेश आहे.

Web Title: House gutted in fire in Akole taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here