Home अहमदनगर अहमदनगर: इन्स्टाग्रामवर ओळख, पळवून नेऊन अत्याचार, आरोपीस अटक

अहमदनगर: इन्स्टाग्रामवर ओळख, पळवून नेऊन अत्याचार, आरोपीस अटक

Ahmednagar News:  सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका १६ वर्षीय युवतीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार (abused) केल्याचा प्रकार.

Identified on Instagram, abducted and abused, accused arrested

अहमदनगर: सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका १६ वर्षीय युवतीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना गुरुवारी यश आले. सोमनाथ देविदास तांबोरे (वय २०, रा. भायगाव, ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीने नगरमधील एका १६ वर्षीय युवतीशी सोशल मीडियाव्दारे ओळख केली. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधत पळवून नेले व पीडितेवर अत्याचार केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. तोफखाना पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात हजर केले असून, आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

Web Title: Identified on Instagram, abducted and abused, accused arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here