Home बीड भरधाव ट्रकच्या धडकेत न्यायाधीशासह चालकाचा मृत्यू  

भरधाव ट्रकच्या धडकेत न्यायाधीशासह चालकाचा मृत्यू  

Latur Accident: भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याची घटना.

Judge along with driver killed in collision with speeding truck Accident

लातूर : भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याची घटना रेणापूर- उदगीर मार्गावरील सेवादासनगर तांडा येथे घडली. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. तो एवढा भीषण होता की, या अपघातात  ओमनी कारचा चक्काचूर झाला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  उद्धव वसंत पाटील (रा. अजनर्सोंडा खु., ता. चाकूर) हे सध्याला बीड येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी ते चालक बळी नंदकुमार टमके (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) यांच्यासोबत ओमनीने (एमएच १७ बीव्ही १२५७) गावाकडे निघाले होते. दरम्यान, रेणापूर- उदगीर मार्गावरील आष्टामोडकडे जाताना सेवादासनगर तांडा येथे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने (एमएच २४ एबी ८४०१) त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. यामध्ये न्यायाधीश पाटील आणि चालक टमके हे जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रक शंभर फुटावरून चुकीच्या दिशेने येत न्यायाधीशांच्या वाहनावर धडकला. घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाला.

Web Title: Judge along with driver killed in collision with speeding truck Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here