Home अहमदनगर अहमदनगर: खून करून मृतदेह नदीपात्रात टाकला

अहमदनगर: खून करून मृतदेह नदीपात्रात टाकला

Breaking News | Ahmednagar:  अनोळखी व्यक्तिचा खून करून कर्जत-बारामती मार्गावरील वायसेवाडी (ता. कर्जत) हद्दीत नांदणी नदीलगत मृतदेह टाकण्यात आला.

Killed and threw the body in the river

कर्जत: अनोळखी व्यक्तिचा खून करून कर्जत-बारामती मार्गावरील वायसेवाडी (ता. कर्जत) हद्दीत नांदणी नदीलगत मृतदेह टाकण्यात आला. तो सोमवारी (दि. २४) सकाळी आढळून आला.

मयताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट-पॅन्ट व हातात भगव्या रंगाचा धागा बांधला आहे. या व्यक्तीचा काही दिवस अगोदर खून करून मृतदेह पाण्यात टाकला असावा, त्यानंतर आरोपींनी ओळख पटू नये किंवा खुनाचा तपास लागू नये, या उद्देशाने येथे आणून टाकले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मयत व्यक्तीच्या डोक्यात व चेहऱ्यावर गंभीर जखमा दिसून येत आहेत. तोंडं दगडाने ठेचल्याचेही दिसत आहे. राशीनचे सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी वाबळे, अमित बर्डे यांच्यासह स्थानिक गुन्हे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह कुजण्यास सुरवात झाल्याने ओळख पटविण्यासाठी मृतदेहास शासकीय रुग्णालयात शवगृहात नेण्यात आले. मात्र, ते नादुरुस्त असल्याने मृतदेह नगर अथवा पुणे येथे नेणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Killed and threw the body in the river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here