Home अकोले अकोले: कृषि कन्येचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन           

अकोले: कृषि कन्येचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन           

Krishi Kanye's guidance to farmers

अकोले: महात्मा फुले  कृषी विद्यापीठाशी संलग्न मालदाडचे श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील कु. संपदा कल्याणराव काकडे हिचे ‘कृषी जागरूकता व औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम 2020’  च्या अभ्यास दौऱ्याचे जामगांव येथे आगमन झाले.

या  दौऱ्यात कृषीकन्येने गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक अनुभव, आधुनिक शेती व शास्त्रीय शेती संदर्भात सविस्तर माहितीसह मार्गदर्शन केले. तसेच माती परीक्षण, बीजप्रक्रिया, एकात्मिक तृण व्यवस्थापन, पीकावरील कीड व रोग व्यवस्थापन, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत मार्गदर्शनासह प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी सरपंच सौ. उषा पारधी, उपसरपंच श्री. प्रकाश महाले, ग्रामविकास अधिकारी श्री. राठोड, शेतकरी श्री. विकास आरोटे, श्री. साहेबराव वंडेकर, बाजीराव वंडेकर, आदींनी त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.

कृषी कार्यानुभव या उपक्रमासाठी श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री साहेबरावजी नवले पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. एल. हारदे कार्यक्रम समन्वयक प्रा.एन.पी.तायडे कार्यक्रम अधिकारी  प्रा.टी डी साबळे, प्रा. पी एस राऊत, प्रा.एन.बी. शिंदे प्रा.एस. एम. कानवडे, प्रा.के.जी. नवले,  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Krishi Kanye’s guidance to farmers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here