Home अकोले दोन लाखापर्यंतचं संपूर्ण कर्ज माफी : उद्धव ठाकरे

दोन लाखापर्यंतचं संपूर्ण कर्ज माफी : उद्धव ठाकरे

नागपूर:  येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यां साठी कर्ज माफी ची घोषणा केली.30 सप्टेबर 2019 पर्यंत चं दोन लाखापर्यंत च कर्ज माफ करण्यात आले आहे या कर्ज माफी ला महात्मा फुले कर्ज माफी योजना असे नाव देण्यात आलं आहे.
यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सात बारा कोरा करण्याचा शब्द मुख्यंत्र्यां नी दिला होता तसेच सरसकट कर्ज माफी ची घोषणा केली होती त्याचं काय झालं असा प्रश्न विचारून हे सरकार आपला शब्द पाळत नाही असं म्हणुन या सरकारचा निषेध करत सभात्याग केला. सामान्य माणसाला मंत्रालयात हेलपाटे मारावे लागू नये म्हणून विभाग स्तरावर CMO कार्यालय सुरू करण्याचा मानस मुख्यमत्र्यां नी बोलुन दाखविला. कर्ज माफी च्या घोषणेला जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नितिन राऊत यांनी ठाकरे सरकारचं यश सांगत अभिनंदन केले या कर्ज माफी साठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म न भरता, कोणतीही लाईन न लावता दोन लाखापर्यंत चे कर्जाचे पैसे डायरेक्ट खात्यात जमा होतील व सात बारा कोरा करन्याच्या वचनाचं पुढील काळात आर्थिक परिसथिती चा आढावा घेऊन विचार केला जाईल असं सुनिल प्रभु यांनी सांगितले.
तर बच्चू कडु यांनी या घोषणे वर पूर्णपणे समाधानी नाही, परंतु शेतकऱ्यां चा 75% सातबारा कोरा होऊ शकतो त्याचा फायदा मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील कोरड वाहू शेतकऱ्यांना होऊ शकतो.
Website Title: Latest News loan waiver of up to two lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here