Home पुणे प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने थेट

प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने थेट

Breaking News | Pune Crime:  प्रेम संबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीने तिच्या  प्रियकराला दगडाने ठेचून मारहाण केल्याची घटना.

Leave the lover's husband and children and come to mea

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी वडाचा मळा परिसरात प्रेम संबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीने तिच्या  प्रियकराला दगडाने ठेचून मारहाण केली. या घटनेची दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याने व्हायरल झाली आहेत. दगडाने केलेल्या मारहाणीत प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.

संबंधित प्रियकर प्रेयसीला तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडं ये असं म्हणत होता. त्यामुळे वारंवार प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात भांडणे होत होती. त्यामुळे या भांडणाला वैतागून मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडाने ठेचले. दगडाने केलेल्या मारहाणीत प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांत प्रेयसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास विठ्ठल चव्हाण यांच्या विरोधात भा. न्या. सं .109, 115 (2) , 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Leave the lover’s husband and children and come to mea

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here