Home क्राईम पॉर्नोग्राफीचं चित्रीकरण, लाइव्ह सेक्स शो रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींसह तिघांना अटक

पॉर्नोग्राफीचं चित्रीकरण, लाइव्ह सेक्स शो रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींसह तिघांना अटक

Live Sex Racket: पॉर्नोग्राफी सिनेमाचं चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी रविवारी दोन अभिनेत्रींसह अन्य एकाला अटक.

Live sex racket busted, three arrested including two actresses

मुंबई: पॉर्नोग्राफी सिनेमाचं चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी रविवारी दोन अभिनेत्रींसह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. पिहू नावाच्या आधारित अ‌ॅपवर पोर्नोग्राफिक सिनेमे प्रदर्शित करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वर्सोवा पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक तरुणी (वय २०), एक महिला (वय ३४) व एका तरुणाचा (वय २७) समावेश आहे. हे तिघे पॉर्न दृश्यांचं चित्रीकरण करून ते मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करायचे. तसंच, युजर्सना महिलांसोबत ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल बुक करण्याची सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून देण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अॅपवर गेल्या काही दिवसात अनेक अश्लील व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. अंधेरी वेस्टमधील भागात हा प्रकार उघडकीस आला. ही माहिती मिळताच आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी पोलीस संधीची वाट बघत होते. अखेर अंधेरी वेस्ट येथील चार बंगला येथे रविवारी अश्लिल व्हिडीओंची स्ट्रीमिंग होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढे पोलिसांनी रेड मारल्यावर तिघांना अटक करण्यात आली. हे तिघे व्हिडीओमधील कलाकार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आता पोलीस पिहू अॅपच्या मालकांच्या शोधात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्ट्रीमिंग शेड्यूलची माहिती युजर्सना मिळायची. यासाठी युजर्सना ए‌ॅपमधील काही कॉईन्स खरेदी करावे लागत होते. ज्यामुळे एॅपवर अपलोड होणारे व्हिडीओ युजर्सना पाहता येतील. एवढंच नाही तर एॅपवर प्रोफाईल असलेल्या युजर्सना महिलांकडून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसारख्या सेवादेखील मिळत होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.

पिहू अ‍ॅपचा (Pihu App) वापर करून पॉर्न कंटेट पाहणाऱ्या युजर्सना त्यांच्या इन्स्टाग्रामवर मेसेज करून लाइव्ह स्ट्रिमिंगच्या वेळा कळवल्या जायच्या. त्यानंतर युजर्सना इन-अ‍ॅप कॉइन खरेदी करायचे. ते रीडीम करून कंटेन्ट पाहता यायचा. अ‍ॅपसाठी काम करणाऱ्या महिला ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलची सेवा देखील युजर्सना पुरवायच्या, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली.

युजर्सकडून ७,५०० रुपये नोंदणी शुल्क देखील घेतले जायचे. लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी आगाऊ पैसे द्यावे लागायचे आणि कॉल सेवेसाठी स्वतंत्र पैसे घेतले जायचे. हा व्यवहार डिजिटल स्वरूपात व्हायचा. एकदा ग्राहकांना अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस मिळाला की त्यांना वेगवेगळ्या महिलांचा प्रोफाइल पाहता यायचा. या प्रोफाइलवर महिलांचे काही प्रमोशनल व्हिडिओ असायचे. ते पाहून युजर त्यांच्याशी संपर्क साधायचे. बहुतांश लाइव्ह स्ट्रिंमिंग कॉमेंट्रीसह असायची, अशी माहिती त्या पोलीस अधिकाऱ्यानं दिली. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आलं आहे.

अटक केलेल्या सर्व आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ (अश्लील सामग्रीची विक्री किंवा सार्वजनिक वितरण), २९३ (२० वर्षांखालील व्यक्तीला अश्लील साहित्य विकणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘युजर्सनी जमा केलेले पैसे नेमके कुठं आहेत? पॉर्न कंटेन्ट तयार करण्यासाठी महिलांवर बळजबरी तर करण्यात आली नाही ना, या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Live sex racket busted, three arrested including two actresses

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here