Home अहमदनगर खा. लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे इतके कोटींची संपत्ती

खा. लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे इतके कोटींची संपत्ती

Breaking News | Ahmednagar: लोखंडे यांच्याकडे १६ कोटींवर संपत्ती तर वाकचौरे यांच्याकडे ६ कोटींची संपत्ती

Lokhande and Bhausaheb Vakchoure have so many crores of wealth

राहाता: शिर्डीचे खासदार व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे व त्यांच्या पत्नीकडे आलिशान वाहने व सोने नाण्याच्या दागिन्यांसह स्थावर मालमत्ता मिळून १६ कोटी हून अधिक संपत्ती आहे. खेमानंद अॅण्ड कंपनीमध्ये खासदार लोखंडे यांचे दीड कोटी रुपयांचे भाग भांडवल आहे.

आपल्याकडे साखर कारखाने, शिक्षण संस्था काहीही नाही. आपण जिरायत पट्ट्यातील कार्यकर्ते आहोत, असे खासदार लोखंडे नेहमीच सांगतात. त्यांनी दिलेल्या विवरणानुसार कार, दागदागिने, मुंबई स्थित इमारतीतील मिळकती व कंपन्यांमधील भाग भांडवलामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. स्वतः लोखंडे यांच्याकडे दोन कोटी एक लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी सौ. मंदा यांच्याकडे दोन कोटी ४७ लाख ५६ हजार ९३८ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. स्वसंपादित स्थावर मालमत्तेची किंमत ११ लाख २२ हजार ७२८ रुपये आहे. पत्नीकडे ३ कोटी ८९ लाख ६८ हजार ४५१ रुपयांची मालमत्ता आहे.

कार, सोने अन् नाणे

खा. सदाशिव लोखंडे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी मंदा लोखंडे यांच्याकडे अधिक संपत्ती आहे. त्यांच्याकडे कार, सोने नाणे, रोख रक्कम आदीसह १२ कोटी १४ लाख रुपये एवढी मालमत्ता आहे. तर खा. लोखंडे यांच्याकडे ४ कोटी ६९ लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यात दोन कोटी ४७ लाखांचे सोने, कार व इतर वस्तू असल्याचे विवरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.

सदाशिव लोखंडे यांनी खेमानंद

दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनी, साई खेमानंद अॅग्रो आणि खेमानंद अॅण्ड कंपनीत दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रामधील माहितीनुसार लोखंडे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

वाकचौरे यांच्याकडे ६ कोटींची संपत्ती

शिर्डी लोकसभा मतदार संघातून ठाकरे सेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे २३ लाख ५२ हजार तर पत्नीकडे ४६ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम आहे. वाकचौरे पती-पत्नीकडे स्थावर व जंगम मालमत्ता जवळपास ६ कोटींची आहे.

भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे ५० तोळे सोने व ५ किलो चांदी आहे. याचे सध्याचे बाजारमुल्य ३३ लाख १२ हजार रुपये आहे. वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती यांच्याकडे ५० तोळे सोने व अडीच किलो चांदी आहे. त्याची किंमत ३१ लाख ३५ हजार रुपये आहे.

२००९पासून प्रत्येक निवडणुकीत नशिब आजमावणारे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उत्पन्नात फारसा फरक पडला नाही. पण त्यांच्या पत्नी सरस्वती यांच्या उत्पन्नात ४ पटीने वाढ झाली आहे. २०१४ मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांचे उत्पन्न ९ लाख ५६ हजार ४०६ इतके होते. ते २०२४ मध्ये ९ लाख ८० हजार ६६० वर पोहचले तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ८ लाख ७५ हजार ८९३ वरुन ३५ लाख ३५ हजार ९८० इतके झाले. २०१४ मध्ये सरस्वती यांच्याकडे ९ हजार रुपये किंमतीची दुचाकी होती. १० वर्षामध्ये मात्र त्यांच्याकडे १४ लाख ५० हजाराची चारचाकी असल्याचे वाकचौरे यांनी सादर केलेल्या शपथपत्राद्वारे स्पष्ट झाले आहे. वाकचौरे यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेतही फारसा फरक पडलेला नाही. पण त्यांच्या पत्नीची एकूण मालमत्ता दुपटीने वाढली आहे. २०२४ च्या शपथपत्रानुसार वाकचौरे यांनी १ कोटी २४ लाख ५६ हजार रुपये तर त्यांच्या पत्नीने १ कोटी ५९ लाख ६५ हजार ४७४ रुपये हातउसणे दिले आहेत. वाहने, सोने चांदी, बचत जंगम स्थावर मालमत्ता जमिनीचे बाजारमुल्य वाढण्याऐवजी घटले. मागील तीन निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रानुसार वाकचौरे यांची निमगाव कोऱ्हाळे येथे ४० आर जमीन आहे. २०१४ च्या शपथपत्रात या जमिनीचे बाजारमुल्य १ कोटी ६७ लाख ६७ हजार इतके दाखविले होते. २०१९ मध्ये या जमिनीचे मुल्य वाढण्याऐवजी घसरुन ९३ लाख २३ हजार ४४० इतके दर्शविले गेले. वाकचौरे पती- पत्नीकडे १०० तोळे सोने व साडेसात किलो चांदी आहे.

Web Title: Lokhande and Bhausaheb Vakchoure have so many crores of wealth

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here