Home क्राईम संगमनेरात ‘लव जिहाद’?  इंस्टाग्राम वरुन ओळख वाढवून विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न

संगमनेरात ‘लव जिहाद’?  इंस्टाग्राम वरुन ओळख वाढवून विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न

Sangamner Crime: इंस्टाग्राम वरुन ओळख वाढवून विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा परप्रांतीय तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Love Jihad

संगमनेर:  इंस्टाग्राम वरुन ओळख वाढवून विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा परप्रांतीय तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  हा ‘लव जिहाद’ चा (Love Jihad) प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वीच लव जिहादचा प्रयत्न फसल्याची घटना घडली होती. काल पुन्हा असा प्रयत्न फसला आहे. तालुक्यातील खांडगाव परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला हा अनुभव आला. एका परप्रांतीय तरुणाने सदर युवती सोबत इंस्टाग्राम वरून ओळख वाढविली. गेल्या दोन वर्षापासून ते एकमेकांना इंस्टाग्रामवरून संपर्कात होते. त्यामुळे दोघांचे संगमनेरला एकमेकांना भेटण्याचे ठरले.

त्यानुसार सदर तरुण संगमनेरला आला. काल सकाळी १० वाजेच्या सुमारास कासारा रोड ते खांडगाव या रस्त्यावर त्याने तिला घेऊन जात असताना तो तिला म्हणाला, ‘तु मला खुप आवडतेस, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे. तू माझे बरोबर माझ्या गावाकडे चल’. तू आली नाहीस तर तुला पळवून घेऊन जाईल, असा दमही त्याने तिला दिला. ती नाही म्हणताच त्याने तिचा हात धरून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या मित्रानेही त्याला या कामासाठी मदत केली. त्यावेळी सदर युवतीने आरडाओरड केली. काही लोक तेथे आले आणि त्यांनी सदर युवतीला सोडवले.

याबाबत सदर युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्रम शहाबुद्दीन शेख, रा. अलीनगर जि. दरभंगा, बिहार व त्याचा एक मित्र नेमतुल्ला या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४ अ, ३६६, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सादर आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Love Jihad’ in Sangamnerat? An attempt to kidnap a student

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here