महाराष्ट्रात निर्बंधात मोठ्या प्रमाणात शिथिलता, जाणून घ्या काय सुरु अन काय बंद

मुंबई | Maharashtra Unlock: आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्बंधाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येईल.
हॉटेल्स, रेस्टॉरंट एकूण क्षमतेच्या ५० टक्के सुरु ठेवता येईल. तसेच शॉपिंग मॉल्स मध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार आहे. हा निर्णय १५ ऑगस्ट पासून लागू होणार आहे.
राज्यातील सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहे. यामध्ये दुकानातील कर्मचारीवर्ग यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे.
राज्यातील खासगी कार्यालय आता २४ तास सुरु ठेवता येणार आहे. कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावं लागणार आहे.
विवाह सोहळ्यासाठी खुल्या जागेत एकूण २०० जणांच्या उपस्थितीत तर हॉलमधील क्षमतेच्या ५० टक्के किंवा एकूण १०० जणांच्या उपस्थित परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील चित्रपट गृहे, नाट्यगृह, धार्मिक स्थळे अद्याप बंदच राहणार आहे. याबाबत निर्णय घेण्यात आला नाही.
त्याचबरोबर राज्यातील शाळा, महाविद्यालये याबाबत एकमत झालेलं नसून अंतिम निर्णय झाला नाही.
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
राज्यातील जिम आणि स्पा. ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना लोकलने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. १४ डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असला पाहिजे. यासाठी मासिक पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Web Title: Maharashtra Unlock News Today
















































