Home अहमदनगर स्वतः च्या वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करणारा आरोपी मुलगा अखेर जेरबंद

स्वतः च्या वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करणारा आरोपी मुलगा अखेर जेरबंद

son accused of murder his own father with an ax arrested

कोपरगाव | Murder Case: रागातून स्वतःच्या वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस भागवत भारम भोसले वय ५५ रा. पढेगाव यास कोपरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो महिन्यापासून फरार होता.

२० जुलै रोजी भारम हिवालदार भोसले हा घरी असताना त्याचा मुलगा भागवत भोसले हा त्याच्या मुलासह घरी आला. आरोपीने भारम भोसले यास विहिरीवरील पाईपलाईनचे झाकण का उघडले याचा जाब विचाराला असता तिघांनी मिळून भारम भोसले यास मारहाण केली त्यावेळी भागवतने त्याच्या ज=हातातील कुऱ्हाडीने भारम भोसले याच्या डोक्यात घाव घातला. यामध्ये भारम हे जखमी झाले. त्यांना शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना ५ ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

आरोपी भागवत भोसले यांच्यावर कोपरगाव व इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही घटना घडल्याने भागवत भोसले पसार झाला होता. आरोपी भागवत हा पढेगाव येथील घराजवळ असलेल्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले.

Web Title: son accused of murder his own father with an ax arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here