Home अहमदनगर मराठ्यांचे वादळ मुंबईच्या दिशेने आज जिल्ह्यात धडकणार – Maratha Reservation

मराठ्यांचे वादळ मुंबईच्या दिशेने आज जिल्ह्यात धडकणार – Maratha Reservation

Maratha Reservation: मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडू द्यायची नाही छातीवर  गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटत नाही- Manoj Jarange Patil.

Maratha Reservation storm of Marathas will hit the district today towards Mumbai

अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे वादळ आज, रविवारी जिल्ह्यात धडकणार आहे. या पदयात्रेतील आंदोलकांची सेवा आणि स्वागतासाठी मराठा समाजासह नगरकरही सज्ज आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथे सायंकाळी सभा होणार आहे. यासाठी दिडशे एकर जमिनीवर स्वच्छता करण्यात आली असून भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

मनोज अरांगे-पाटील यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हमाले की, राज्य सरकार सोबत माझं बोलणं झालेत नाही. त्यांच्याशी बोलण्याची काही गरज नाही. आम्ही आरक्षण मिळण्यावर ठाम आहोत. त्यांच्याशी बोलून काहीही फायदा नाही. सरकार जाणून बुजून आरक्षण देत नसेल तर मला  टोकाचं पाऊल उच मला २६ जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करायचंच आहे. पण या विकाणाहून आमरण उपोषण करत जाण्याचा माझा विचार आहे. समाजाला विचारून तो निर्णय घेणार असल्याचे जांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडू द्यायची नाही छातीवर  गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटत नाही. पुढे  बोलत असताना ते म्हणाले , मराठ्यांची मुल संपवण्याचा घाट घातला जातोय, मराठ्यांची मुलं जीवन संपवत आहेत. तरीही, सरकार गांभीयान घेत नाही. उपोषणामुळे माझ शरीर साथ देत नाही. लढाई आहे. आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे, यावेळी ते भावुक आले.

मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा संघर्ष यात्रा अंतरवाली सराटीपासून सुरू झाली आहे. ही यात्रा नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सकाळी आठ वाजता दाखल होणार आहे. पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेदृष्टीने शनिवारी पदयात्रा मार्गाची जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी पाहणी केली. दरम्यान पदयात्रेत सहभागी मराठा बांधवांच्या नास्त्यासाठी ४ टन पोहे आणि जेवणासाठी २ टन पिठले तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, ओलाच्या पाहणी दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे उपस्थित होते. जरांगे यांची पदयात्रा आज पाथर्डी तालुक्यातून पुढे मार्गस्थ होणार आहे. सकाळी आठ वाजता पदयात्रा तालुक्यातील मिडसांगवी गावात प्रवेश करणार आहे. या ठिकाणी नास्त्यासाठी सुमारे ४ टन पोहे, पाणी व इतर अल्पोपहाराची सोय परिसरातील गावच्या नागरिकांनी केली आहे. पदयात्रेतील लोकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था भुतेटाकळी फाटा, आगसखांड व वाळुंज शिवारात केली गेली आहे. तीन ठिकाणी मिळून सुमारे शंभर एकरच्या परिसरावर जेवणाचे स्टॉल, पाणी, वाहन पार्किग अशी व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. वाळुंज, आगखांड शिवारातील जेवणाच्या ठिकाणी सुमारे २ टन पिठले भाकरीबरोबर जेवणासाठी केले जाणार आहे. या जागेवर दोन्ही बाजूने जेवणाचे स्टॉल लावले जाणार आहेत.

यासह टेम्पोत केळी, खिचडी, मसाले भात, लापशी, चपाती, भाकरी, सुकी भाजी, चटणी व ठेचा अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था स्वयं स्फूर्तीने नागरिकांनी केली आहे. जेवणाचे पाकीटही स्टॉलवर ठेवले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे हजारो बॉक्स बाटल्या यावेळी वाटप करण्यात येणार आहे. फुंदे टाकळी फाटा व पाथर्डी शहरात नाईक चौकात आयोजकांकडून जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून जेसीबीतून फुलांद्वारे पदयात्रेचे स्वागत केले जाणार आहे. मिडसांगवी ते नगरपर्यंत सुमारे ८५ किलोमीटरचा पदयात्रा रस्त्याची पाहणी जिल्हा पोलीस प्रमुख ओला व त्यांच्या पथकाने पाहणी करूनची ठिकाणच्या आयोजकांना सूचना केले आहेत.

नगरहून पाथर्डी मार्गे मराठवाड्याला जाणारी कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक वळविण्यात आली आहे. तर याच महामार्गावरील पाडळसिंगी वरून नगरकडे येणारी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. या रस्त्यावर असणारी अंतर्गत वाहतूकही स्थानिक पोलिसांनी वळवली आहे.

Web Title: Maratha Reservation storm of Marathas will hit the district today towards Mumbai

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here