संगमनेर: सारोळे पठार ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध
सारोळे पठार ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध
संगमनेर: – संगमनेर तालुक्यातील अतिशय महत्वाच्या सारोळे पठार ग्रामपंचायतची निवडणुक अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजयभाऊ फटांगरे याच्या नेतृत्वाखाली माघाराच्या दिवशीच बिनविरोध झाली.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
गावात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक एकांत राहुन गावचा विकास व्हावा यासाठी पक्षभेद विसरुन कृषी सभापती अजय फटांगरे यांचा नेतुत्वाखाली ग्रामस्थांनी एकमत येत ही निवडणुक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला गावच्या विकासासाठी सर्वांनीच एकमुखी पाठिंबा दिला. आज शनिवार माघारीच्या शेवटचा दिवस असल्याने इतर उमेदवारांनी आपआपले अर्ज माघारी घेतल्याने सरपंचपदी मागील मुख्याध्यापिका श्रीमती अहिल्याताई ज्ञानदेव घुले व उपसरपंचपदी प्रशांत गवराम फटांगरे याची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्यपदी सविता सागर मदने, मंजुश्री विलास फटांगरे , प्रशांत प्रकाश घुले, माधुरी प्रकाश पोखरकर, इंद्रायणी संतोष फटांगरे, पोपट यशवंत मेढे, नीलम मारुती घोडे, नवनाथ शांताराम कडु याची एकमताने निवड करण्यात आली आहे. याकामी डॉ. सुधीर नाना पोखरकर, हौशीराम पोखरकर , डॉ. सय्यद मोमीन, डॉ. सर्जेराव फटांगरे ,लक्ष्मणराव फटांगरे, भारत फटांगरे, अमित बादशहा फटांगरे , तुकाराम श्रीपत फटांगरे यांची मदत लाभली. या गावाने जिल्हामध्ये एक आदर्श घालुन दिला आहे. या निवडीचे महाराष्ट्र राज्याचे नेते माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीरजी तांबे , इंद्रजितभाऊ थोरात यांच्यासह सर्वांनीच अभिनंदन केले.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Marathi Batmya Today Live Sangamner