Home क्राईम संगमनेर: विवाहितेची नदीत उडी घेऊन आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर

संगमनेर: विवाहितेची नदीत उडी घेऊन आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर

Sangamner News:  पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीची नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Married woman committed suicide by jumping into the river

संगमनेर: पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीची नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील जोर्वे या ठिकाणी घडली. ही घटना मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता घडली. याबाबत मृत महिलेच्या वडिलानी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत पत्नीला मारझोड करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने प्रवरा नदीत उडी घेऊन जीवन संपविले.  

मनिषा अरूण वाळके (रा. जोर्वे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी वडिल दत्तात्रय किसन पवार ( रा. जोर्वे) यांनी याबाबत फिर्याद दिली असून यात म्हंटले आहे की,  आरोपी अरूण सोपान वाळके याच्या सोबत माझ्या मुलीचे लग्न झाले होते मात्र अरूण वाळके याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नी मनिषा हिला नेहमी त्रास देत होता तर दारूच्या नशेत अनेकवेळा मारहाण करत होता. अनेक दिवस तिने हा त्रास सहन केला. दरम्यान मंगळवारी या दोघांमध्ये याच कारणावरून पुन्हा एकदा वाद झाला. या वादातून मयत मनिषाला नवऱ्याने मारहाण केली. या सततच्या त्रासाला कंटाळून मनिषा वाळके हिने प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला तिचा पती अरूण वाळके हा जबाबदार आहे. अशी फिर्याद मयताच्या वडिलांनी दिल्यानंतर तालुका पोलीसांनी आरोपी अरूण वाळके याच्या विरूद्ध गुन्हा रजि. नं. ६०५/२०२३ भादंवि कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास तुमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्री. सातपुते हे करीत आहे.

Web Title: Married woman committed suicide by jumping into the river

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here