Home अहिल्यानगर अहिल्यानगर: फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

अहिल्यानगर: फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar: फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू.

Massive fire breaks out at furniture shop 5 members of the same family die

नेवासा फाटा:  नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण आगीच्या घटनेने परिसर हादरला आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

नेवासा फाटा कॉलेज परिसरातील कालिका फर्निचर दुकानाला रात्री 1 च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या मयूर रासने यांच्या कुटुंबाला या आगीने वेढले. आगीचा भडका इतका तीव्र होता की, कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (वय 36), त्यांची पत्नी पायल (वय 30), त्यांचे दोन मुलं अंश (वय 11), चैतन्य (वय 6) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा गुदमरून मृत्यू झाला. मयूर यांचे वडील अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले असल्याने बचावले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. दुकानातील लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले.

Breaking News: Massive fire breaks out at furniture shop 5 members of the same family die

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here