Home महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण आले समोर

वैद्यकीय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण आले समोर

Breaking News | Student Suicide: दंतचिकित्सा पदव्युत्तर पूर्व परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या.

Medical student commits suicide by hanging

यवतमाळ : दंतचिकित्सा पदव्युत्तर पूर्व परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यवतमाळ येथील या तरुणीने पुणे येथे मामाच्या घरी बुधवारी हे टोकाचे पाऊल उचलले. गायत्री सतीश काळे (२५) रा. विश्रामगृहाजवळ रुईकरवाडी, यवतमाळ असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने यवतमाळ येथे खळबळ उडाली आहे.

शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील गायत्री ही एकुलती एक कन्या होती. ती अभ्यासात हुशार होती. बारावीनंतर तिने वर्धा येथे बीडीएसचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर दंतचिकित्सा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एमडीएस पात्रता पूर्व परीक्षा तिने दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्यात गायत्रीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे सांगण्यात येते. या निकालानंतर ती नैराश्यात असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

सतीश काळे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते पत्नी व मुलीसह पुण्यात म्हेवण्याकडे गेले होते. तेथे असतानाच एडीएस पूर्व परीक्षेचा निकाल लागला. गायत्रीला कमी गुण मिळाल्याने ती नाराज होती. मात्र कुटुंबीयांनी तिची समजूत काढली व पुन्हा अभ्यास करून प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. बुधवारी सकाळी तिने आई, वडील, मामा, मामींना थोडा वेळ झोपते असे सांगून ती पहिल्या मजल्यावरील खोलीत गेली.

महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

तिचे आई, वडील मॉर्निंग वॉककरिता गेले. ते परत आल्यानंतर त्यांनी गायत्रीला आवाज दिला. मात्र दरवाजा ठोकून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला, तेव्हा गायत्री गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हे दृश्य बघून तिचे आई, वडील, मामा, मामी यांच्या हृदयाचा ठोका चुकला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पंचनामा केला. पुणे येथे शवविच्छेदन करून गायत्रीचा मृतदेह यवतमाळ येथे आणण्यात आला.

Breaking News: Medical student commits suicide by hanging

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here