Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार

Breaking News | Ahilyanagar Crime: एका ग्रामीण भागात वडिलानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना.

Minor girl abused by father

शेवगाव:  तालुक्यातील एका ग्रामीण भागात वडिलानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. ही मुलगी अल्पवयीन असून, तिने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या वडिलाच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे, आरोपी काही महिन्यांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून शिक्षा भोगून आल्यावर त्याने है घृणास्पद कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असून, तो नशेत आईस शिवीगाळ, मारहाण करतो. सोमवारी (दि. २६) पीडितेची बहीण व तिचा नवरा हे त्यांच्या घरी आले होते. यावेळी आरोपीने दारू पिऊन त्यांच्याशी भांडण केले. त्यामुळे ते दोघे त्यांच्या गावी निघून गेले. यावेळी त्यांना घाबरून पीडित मुलगी व तिची आई तेथून पळून गेले. गुरुवारी (दि. २९) पीडित मुलगी तिच्या काकांच्या घरी काकूसोबत असताना आरोपीने तिथे घरी जाऊन चाकूचा धाक दाखवत धमकावले. यावेळी सदर मुलीची काकू भिऊन तेथून पळून गेली. यावेळी आरोपीने स्वतःच्या मुलीचा हात धरून ओढून नेत एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात नेले. यावेळी पीडितेला चाकूचा धाक दाखवत, जिवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. मुलीने त्याच्या हाताचा चावा घेऊन स्वतःची सुटका करून घेत तेथून पळून गेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Breaking News: Minor girl abused by father

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here