Home अहमदनगर अहमदनगर: तलावात बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

अहमदनगर: तलावात बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: मैत्रिणींसोबत विळदघाट शिवारातील गवळीवाडा येथे गेलेल्या १७ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना.

minor girl died after drowning in a lake

अहमदनगर : मैत्रिणींसोबत विळदघाट शिवारातील गवळीवाडा येथे गेलेल्या १७ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २६) घडली.

समीक्षा लाला कुसमाडे (रा. नवनागापूर, ता. नगर) असे मयत मुलीचे नाव आहे. मयत मुलगी गुरुवारी मैत्रिणींसोबत विळद‌द्घाट शिवारातील गवळीवाडा येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेली होती. मैत्रिणींसोबत खेळत असताना दगडावरून तिचा पाय घसरला. ती पाण्यात पडली. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला असून, तिचा मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: minor girl died after drowning in a lake

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here