Home अहमदनगर अहमदनगर: यात्रेतून अल्पवयीन मुलीस पळविले

अहमदनगर: यात्रेतून अल्पवयीन मुलीस पळविले

Ahmednagar News: रामनवमी यात्रेतून अल्पवयीन मुलीस पळवून (abducted ) नेल्याची घटना.

a minor girl was abducted from the pilgrimage

श्रीरामपूर | Shrirampur:  श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील एक अल्पवयीन मुलगी श्रीरामपूर येथील श्रीराम नवमी यात्रेत आली असता तिला पळवून नेले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 12 वीत शिक्षण घेत होती. मात्र ती एक वर्षापासून घरीच होती. तिचे वडील शेतात असताना तिच्या आईला सांगून ही अल्पवयीन मुलगी 2 मार्च रोजी सकाळी 11.30 वा. श्रीरामपूर येथे मैत्रिणीसोबत यात्रेला जाते असे सांगून श्रीरामपूरला जाण्यासाठी गेली. परंतु, नंतर ती घरी न परतल्याने तिच्या मोबाईलवर घरच्यांनी फोन केला असता तिचा मोबाईल बंद आला. त्यामुळे सदर मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून कशाचेतरी आमिष दाखवून तिला पळवून नेले असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.

सदरची मुलगी ही रंगाने गोरी असून तिची उंची 5 फूट, तिच्या अंगावर पोपटी रंगाचा टॉप आणि पांढर्‍या रंगाची लेगीज आहे. सदर वर्णनाची मुलगी कोठे आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: a minor girl was abducted from the pilgrimage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here