Home अहमदनगर भर रस्त्यावर दोन शालेय विद्यार्थीनींचा विनयभंग

भर रस्त्यावर दोन शालेय विद्यार्थीनींचा विनयभंग

Molested of two schoolgirls on Bhar Road

पाथर्डी | Pathardi: तालुक्यातील तिसगाव येथील शाळेतुन घरी जात असणाऱ्या दोन अलपवयीन विद्यार्थ्यीनींचा चिचंहारी खाडी ओढ्याजवळ रस्त्यावरच अडवुन विनयभंग (Molested) केल्याची घटना घटना घडली आहे. बुधवारी (दि.30) सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली आहे. संशयितास पोलीसांनी अटक केली असून त्याच्यावर पोस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने पालक संतप्त झाले आहेत.

शहाबाज राजु पठाण (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हे दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण भागातील मुली तिसगावला शाळेत येतात. रस्त्यावर दोन शाळकरी मुलीचा विनयभंग शाहबाज पठाण याने केला. मुलीला खाली पाडुन व मास्क काढायला लावुन तिचा विनयभंग केला. मुलगी ओरडली तेव्हा तिला सोडुन दिले. व लगेच दुसर्‍या सायकलवरुन येणार्‍या मुलीला पठाणने धरले. तिला ओढत रस्त्याच्या बाजुला नेले. त्यावेळी पहीली मुलगी ओरडल्याने व कोणीतरी पाठीमागुन येत असल्याचे पाहुन पठाण शेतात पळुन गेला. या प्रकाराने मुली प्रचंड घाबरल्या होत्या.

याबाबत पीडीत मुलीच्या संतप्त आई-वडील व नातेवाईकांनी शहाबाज पठाणच्या घरी जाऊन त्याच्या पालकाला प्रकार सांगितला. मात्र त्यांनीही अरेरावी केली. अखेर पालकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दोन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी सहाबाज राजु ठाण याच्या विरुद्ध बालकांचे लैंगीक शोषणापासून संरक्षण कायदा (पोस्को) व विनयभंगांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Molested of two schoolgirls on Bhar Road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here