एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी मनपा कनिष्ठ अभियंत्यास अटक
Breaking News | Pune Bribe Case: एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
पिंपरी (पुणे): कंपनीवर कारवाई न करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. ही कारवाई बुधवारी महापालिका भवनसमोर करण्यात आली.
स्वप्नील मनोहर पाटील (वय ४०) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी तीसवर्षीय व्यक्तीने ‘एसीबी’कडे तक्रार दिली आहे. त्यानुसार सापळा रचून पाटील याच्यावर कारवाई करण्यात आली.
कंपनीवर कारवाई न करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.१४) महापालिका भवनासमोर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची श्री ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीमधून वायू गळती होऊन वास येत असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडे आली होती. या तक्रारीवरून कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांनी २४ एप्रिल रोजी श्री ट्रेडिंग कंपनीमध्ये स्थळ पाहणी करून पंचनामा केला. पुढील कारवाई न करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली.
Breaking News: Municipal Corporation junior engineer stuck in case of taking one lakh rupees Bribe