Home अकोले अकोले येथील छोट्या पुलांवरून एकास दारू पाजून वाहत्या पाण्यात ढकलून खून, हे...

अकोले येथील छोट्या पुलांवरून एकास दारू पाजून वाहत्या पाण्यात ढकलून खून, हे आहे कारण  

Murder of one by being pushed into flowing water from small bridges

अकोले | Murder Case: कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सरपंचाकडे केल्याने याचाच राग मनात धरून गर्दनी येथील दशरथ नारायण मडके याचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी मडके यांच्या पत्नी यांनी फिर्याद दाखल केल्याने ८ ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दशरथ मडके यांना दारूच्या नशेत अकोले येथील छोट्या पुलांवरून वाहत्या पाण्यात ठार मारण्याच्या हेतूने ढकलून दिले असे फिर्यादीत अनुसया मडके यांनी म्हंटले आहे.

दशरथ नारायण मडके रा, गर्दनी यांचा पोल्ट्री व्यवसाय होता. देवजी खोडके याने या पोल्ट्रीतून कोंबड्या चोरून नेल्याचा प्रयत्न मडके यांनी सरपंचाकडे तक्रार केली होती.  

२ ऑक्टोबर रोजी मयत दशरथ मडके, आरोपी देवजी खोडके व कावजी मेंगाळ हे तिघे शेतात बाजरीचे दाने काढण्याचे काम केल्यानंतर अकोलेत आले. अकोले येथील छोट्या अगस्ती पुलावर दारू प्यायला बसले. दारू संपल्यावर त्यांनी गावात जाऊन पुन्हा दारू आणून पिली. दशरथ मडके हे घरी ना आल्याने त्याच्या पत्नीने खोडके यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर अनुसया यांनी पती बेप्पत्ता असल्याची तक्रार दाखल केली. असे फिर्यादीत म्हंटले आहे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मृत दशरथ पाण्यात पडून वाहून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. नदीपात्रात शोध घेण्यात आला. मृतदेह शेकईवाडी प्रवरा नदीपात्रता आढळून आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहे.

Web Title: Murder of one by being pushed into flowing water from small bridges

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here