Home अहमदनगर भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल  

भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल  

Nagar Harassment of a woman selling vegetables

नगर | Nagar: नगर येथील नेप्ती कांदा मार्केट येथे दुपारी ३:४५ दरम्यान एका तरुण विवाहित ३५ वर्षीय भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पिडीत महिला ही नागापूर, बोल्हेगाव परिसरात राहणारी आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी नवनाथ राउत रा. बृहाननगर यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह भाजीपाला खरेदी करण्यासाठी नेप्ती कांदा मार्केट येथे गेलो असता भाजपाला खरेदी करून जात असताना आरोपी नवनाथ राउत याने पिडीत महिलेला हातवारे करून थांबण्याचा इशारा करून रिक्षातून तिच्या साडीचा पदर ओढून खाली ओढण्यात आले. तेव्हा फिर्यादीचे कपडे फाटून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. महिलेला डोळा मारत म्हणाला की,मी नवनाथ राउत बृहाननगरचा आहे. तुला काय करायचे ते करून घे असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घटनास्थळी सहायक पोलीस राउत यांनी भेट दिली आहे. नवनाथ आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Nagar Harassment of a woman selling vegetables

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here