….तर पत्रकारांच्या संघटनानी मतभेद बाजूला ठेऊन हिताच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची गरज- डॉ. विश्वास आरोटे
Ahmednagar News: राज्यात विभिन्न मताच्या पक्षाचे नेते एकत्र येऊन सरकार बनवीत असतील तर पत्रकारांच्या संघटनानी मतभेद बाजूला ठेऊन आपल्या हिताच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची गरज.
अहमदनगर: राज्यात विभिन्न मताच्या पक्षाचे नेते एकत्र येऊन सरकार बनवीत असतील तर पत्रकारांच्या संघटनानी मतभेद बाजूला ठेऊन आपल्या हिताच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची गरज आहे. भविष्यातील काळाची गरज ओळखून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ, विधिमंडळ वार्ताहर संघ एकत्र आले आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी केले.
अकोले येथे पत्रकार संघाच्या वतीने दिपावली निमित्ताने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात डॉ आरोटे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर हे होते. यावेळी अगस्ती पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलिक वाळेकर. नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, आदी उपस्थित होते.
डॉ. आरोटे म्हणाले की, राजकारणात एकमेकांवर टिका करणारे राजकीय नेते राज्यात पहाटे, दुपारी, सकाळी कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापू शकतात मग पत्रकारांनी देखील वेगळ्या चूल कशासाठी मांडायच्या आपल्या हक्कासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे हीच ओळखून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाबरोबर श्रमिक पत्रकार संघ विधिमंडळ वार्ताहर संघ एकत्र आले भविष्यात देखील पत्रकारांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी पत्रकारांना शासनाकडून कोणतेही मदतीची अपेक्षा नाही मात्र पत्रकारांची संरक्षण होणे ही काळाची गरज आहे यासाठी पत्रकारांनी देखील एकत्र येणे यावे, पत्रकार संघटना नी आता मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. आरोटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश रेवगडे यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता जाधव यांनी मानले. सर्व सभासद बांधवांना दिवाळी किट मिठाई, साखर,तूप वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हरिभाऊ फापाळे, सुरेश देशमुख, शंकर सांगरे, सुनील आरोटे, निखिल भांगरे, ओंकार अस्वले, निलेश वाकचौरे, दत्ता जाधव, दत्ता हासे, ललित मुतडक आदींनी प्रयत्न केले.
Web Title: need for journalists’ organizations to put aside their differences vishwas Arote
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App