Home नेवासा पतीनेच पत्नीला विष पाजून जीवे मारण्याचा केला प्रयत्न

पतीनेच पत्नीला विष पाजून जीवे मारण्याचा केला प्रयत्न

Nevasa Husband tries to murdered his wife

नेवासा | Nevasa: केवळ पैशासाठी खुद्द पतीनेच आपल्या पत्नीचा विष पाजून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे.

पत्नीने पतीस पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या तोंडात विषारी औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उमेश भांगे पती याने  नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आपली पत्नी निर्मला भांगे वय  हिला मोटारसायकल सोडविण्यासाठी पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या गोष्टीचा पतीने मनात राग धरून फिर्यादीचे केस धरून खाली पाडून तांब्यांत विषारी औषध कालवून फिर्यादीच्या तोंडात टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पिडीत महिला निर्मला भांगे हिच्यावर नेवासा फाटा येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निर्मला भांगे यांनी जबाब नोंदविला आहे. यावरून उमेश एकनाथ भांगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर हे करीत आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Nevasa Husband tries to murder his wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here