Home अहमदनगर ना कारखाना, ना साखर कारखाना मग आ. निलेश लंकेनी कसा उभारला कोविड...

ना कारखाना, ना साखर कारखाना मग आ. निलेश लंकेनी कसा उभारला कोविड सेंटरसाठी पैसा

Nilesh Lanke Covid Centre 

पारनेर: राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी मोफत कोरोना केंद्र उभारले असून त्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. आमदार निलेश लंके हे कोविड सेंटरसाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. त्याची कुठलीही संस्था नाही, साखर कारखाना नाही मग आमदारांनी ११०० बेडचं कोविड सेंटर उभारले कसे असा त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलय.

आमदार निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मदत, देणगी आणि वर्गणीतून हे कोविड सेंटर उभारले आहे. आमदारकीची निवडणूकदेखील लोकवर्गणीतून लढवली होती. माझ्याकडे कारखाना नाही, संस्था नाही म्हणजे मी काहीच करायचं नाही का: असा प्रतिप्रश्नच लंके यांनी केला होता. मी जेव्हा संकल्पना मांडली तेव्हा अनेक मदतीचे हात पुढे आले. दररोज मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. कोणी राशन देतय कोणी भाजीपाला तर कोणी आर्थिक मदत देत असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. गाव यात्रेला जशी वर्गणी धान्य गोळा केलं जात तसेच इथ होत आहे. देशातून, परदेशातून, राज्यातून आम्हाला मदत मिळत आहे. नऊ ते दहा ट्रक धान्य आलंय. भाजीपाल्यासाठी रांग लागते, एक ते दोन महिन्यासाठी पंक्ती बुक झाल्या आहेत. जेवण, नाष्टा कोणी द्यायचे हे आधीच ठरलंय. जशी धार्मिक स्थळाला मदत मिळते तशी आम्हाला येथे मिळत आहे.   

Web Title: Nilesh Lanke Covid Centre 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here