Home अहमदनगर Suicide: लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Suicide: लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

One commits suicide by strangling a lemon tree

Ahmednagar | अहमदनगर: लिंबाच्या झाडाला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. दत्तात्रय हरिभाऊ पोहाळे वय ५५ मूळ रा. नेवासा हल्ली रा. बोल्हेगाव नगर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोहोळे यांनी आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समोर आले नाही.

पोखर्डी (ता. नगर) शिवारातील आकाश हॉटेलच्या समोर गणपती मंदिराशेजारी लिंबाच्या झाडाला दत्तात्रय पोहळे यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. बुधवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. दत्तात्रय यांना शिवम दत्तात्रय पोहळे यांनी उपचार करणे कामी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान दत्तात्रय हे उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोहळे यांनी कोणत्या कारणातून गळफास घेतला याचा तपास पोलीस नाईक कावरे करीत आहेत.

Web Title: One commits suicide by strangling a lemon tree

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here