संगमनेर: वेठबिगार कामगार प्रकरणातील तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी
Breaking News | Sangamner: तिघांना ताब्यात घेतले असून तिघे फरार आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
संगमनेर: तालुक्याच्या पठार भागात दगडखाणीवर काम करणाऱ्या वेठबिगार व बालकामगारांची प्रशासनाने नुकतीच मुक्तता केली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना ताब्यात घेतले असून तिघे फरार आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखाणीवर काम करणाऱ्या ३८ वेठबिगार कामगार व ३१ बाल कामगारांची मुक्तता केली
आहे. याप्रकरणी कामगार अधिकारी संदीप हरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी सुभाष मोरसिंग राठोड (शेंडेवाडी), मधुकर शिवलाल दळवी (कौठे मलकापूर), सोपान चितळकर (चितळकर वस्ती), विठ्ठल पुंजा बिचकुले (पळशी, पारनेर), माणिक हांडे, बबन कारंडे (दोघेही रा. हांडेवाडी) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील तिघांना ताब्यात घेतले असून तिघे फरार आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तिघांना संगमनेर येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Breaking News: One-day jail for three accused in the homeless workers