Home Accident News अहमदनगर: देवदर्शनाला जाताना टेम्पो-स्कॉर्पिओच्या धडकेत एक ठार आठ जखमी

अहमदनगर: देवदर्शनाला जाताना टेम्पो-स्कॉर्पिओच्या धडकेत एक ठार आठ जखमी

Breaking News | Ahmednagar: स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी नाशिकला देवदर्शनाला चालले होते, धोकादायक वळणावर टेम्पो आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर आठ जण जखमी.

One killed and eight injured in collision with Tempo-Scorpio

पाथर्डी | Pathardi: तालुक्यातील फुंदे टाकळी फाट्यावरील धोकादायक वळणावर टेम्पो आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर आठ जण जखमी झाले आहेत. नारायण श्रीकिसन निकम (वय ४५, रा. नाथापूर, जि. बीड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: बीडवरून पाथर्डीकडे येणारी स्कॉर्पिओ व पाथर्डीकडून बीडच्या दिशेने जाणारा टेम्पो यांची सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास फुंदे टाकळी फाट्यावर समोरासमोर धडक झाली. यामध्ये नारायण निकम यांना जबर मार लागला. त्यांना प्रथम पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात सुरेश महेश शिंदे, सुनील जीवन पवार, पुष्पा सुरेश शिंदे, अर्चना नारायण निकम, ऊर्मिला सुनील पवार, लीलाबाई मदन निकम, सीमा मिनीनाथ अबुज, सुराबाई सखाराम राऊत (सर्व रा. नाथापूर, बीड) असे आठ व्यक्ती जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलीस हवालदार भाऊसाहेब खेडकर, पोलिस कॉन्स्टेबल किरण बडे घटनास्थळी दाखल झाले. स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी नाशिकला देवदर्शनाला चालले होते. त्या वेळी हा अपघात झाला.

Web Title: One killed and eight injured in collision with Tempo-Scorpio

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here