Home अहमदनगर अहमदनगर: एकाचा खून, शरीराचे तुकडे करुन पाटात टाकले

अहमदनगर: एकाचा खून, शरीराचे तुकडे करुन पाटात टाकले

Breaking News | Ahmednagar: अनोळखी पुरुषाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाथर्डी ब्रँच पाटात टाकल्याची घटना.

One was killed, the body was cut into pieces and thrown into a pot

नेवासा: तालुक्यातील देडगाव येथे अनोळखी पुरुषाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून मुळा कालव्याच्या पाथर्डी ब्रँच पाटात टाकल्याची घटना घडल्याने देडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत देडगावचे पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाणे (वय-४७) यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१६ मे रोजी मी घरी असताना मला सरपंच चंद्रकांत भानुदास मुंगसे यांनी देडगावच्या हद्दीतील पाटात एका माणसाच्या पायाचा तुकडा पाण्यावर तरंगत आहे, अशी माहिती दिली. माहिती मिळताच मी घटनास्थळी आलो. तत्काळ कुकाणा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक किरण पवार यांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस नाईक किरण पवार हे घटनास्थळी आले. त्यानंतर आम्ही पंचासमवेत पाहणी केली असता प्रथम पृष्ठभाग व मांडी असलेला कुजलेला मांसाचा तुकडा मिळून आला. त्यानंतर पुढे काही अंतरावर एका पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये अनोळखी मानवी कुजलेले पुरुष जातीचे मुंडके, धडाचा कुजलेला मांसाचा तुकडा, त्यास करदोरा व गुडघ्याचा कुजलेला मांसाचा तुकडा मिळून आला आहे. पोलिसांनी दोन पंचासमक्ष पंचनामा केला. कुजलेले मांसाचे तुकडे हे पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेतले.

याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भा. दं वि. कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: One was killed, the body was cut into pieces and thrown into a pot

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here