संगमनेर तालुक्यात धबधब्याखाली आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
Sangamner News: पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. (drowned)
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागात दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या मित्रांसमवेत कळमजाई देवी मंदिर परिसरातील धबधब्याखाली आंघोळीसाठी गेलेल्या तरुणांमधील एका 17 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने आंबी खालसा परिसरात शोककळा पसरली आहे.
पठारभागात पाऊस झाल्याने कळमजाई येथील देवीचा धबधबा चांगलाच कोसळत आहे. अशातच याच तळ्यात जहीर शेख व त्याचे मित्र आंघोळीसाठी उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच जहीरला पाण्याबाहेर काढून खासगी रुग्णवाहिकेद्वारा सुरुवातीला घारगाव येथील भंडारी रुग्णालयात तर त्यानंतर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेने आंबी खालसा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: young man drowned in Sangamner taluka after going for a bath under the waterfall