Home अहिल्यानगर शिर्डीत साईबाबांच्या झोळीत आपली ३३ लाखाची पूंजी

शिर्डीत साईबाबांच्या झोळीत आपली ३३ लाखाची पूंजी

Breaking News | Shirdi: Our capital of 33 lakhs in the bag of Saibaba in Shirdi.

Our capital of 33 lakhs in the bag of Saibaba in Shirdi

शिर्डीः  अमेरीकेचे भारतातील वाणिज्य दूत माईक हँकी यांना तीस वर्षांपासून साईंच्या दर्शनाची ओढ होती. तर सोलापूरातल्या मंदाकिनी गवसणे यांनी एकदाही शिर्डीत आलेल्या नसताना सेवानिवृत्तीनंतर आपली ३३ लाखाची पूंजी साईच्या झोळीत, सत्पात्री दान म्हणून टाकली.

काल या दोघा अनोख्या साईभक्तांना साईमंदिरातील मध्यान्ह आरतीला सर्वात पुढे उभे राहण्याचा मान देण्यात आला. एका अर्थाने हे दोघे साईच्या दरबारातील गुरूपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवसाचे प्रमुख पाहुणे होते.

साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या दोघांचा शाल भेट देऊन सन्मान केला. हँकी तीस वर्षांपूर्वी कोईमतूरच्या मित्राकडे गेले. त्याने साईंची महती अन सबका मालिक एक या शिकवणुकीची महती सांगितली. तेव्हापासून शिर्डीची ओढ लागली.

मग त्यांनी शिल्लक असलेली ३३ लाख रूपयांची रक्कम साईसंस्थानला काही दिवसांपूर्वी दान देऊन टाकली. विशेष म्हणजे दान देण्यापूर्वी त्या एकदाही शिर्डीत आलेल्या नव्हत्या. सत्पात्री दान व्हावे यासाठी त्यांना बाबांची झोळी आपली वाटली.

काल गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्या दिवशी हे दोघे अनोखे साईभक्त बाबांच्या नगरीत आले. साईमंदिरातील मध्यान्ह आरतीला सभामंडपातील सर्वात पुढे असलेल्या दोन्ही बाजूच्या खांबालगत या दोघांना स्थान देऊन साईसंस्थानच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अमेरिकेचे भारतातील वाणिज्य दूत माईक हँकी हे भगवा कुर्ता परिधान करून साईदर्शनासाठी आले. त्यांना बाबांच्या सब का मालिक एक या संदेशाबाबत आस्था असल्याचे जाणवले. त्यांना तेलगू आणि तामीळ भाषा अवगत आहे. येथील फलक या दोन्ही भाषेत का आहेत. अशी विचारणा केल्यानंतर येथील साठ टक्के भाविक दाक्षिणात्य असल्याचे सांगितले.

Web Title: Our capital of 33 lakhs in the bag of Saibaba in Shirdi

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here