Home Accident News Accident: मालट्रक पलटी  होऊन अपघात एक जण ठार

Accident: मालट्रक पलटी  होऊन अपघात एक जण ठार

Pathardi Accident One killed in truck overturn

पाथर्डी | Accident| Pathardi:  तालुक्यातील माणिकदौंडी घाटात केळवंडी गावाच्या शिवारात मालट्रक पलटी अपघात घडला. या अपघातात क्लीनर रवींद्र उर्फ रविराज बप्पासाहेब खंडेभराड वय 24( रा डोमेगाव ता.अंबड जि. जालना) याचा जागीच मृत्यु झाला आहे. हा अपघात  मंगळवारी पहाटे घडला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अतुल शेळके, ईश्वर गर्जे, वाहन चालक राजेंद्र सुद्रुक यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बारामतीहून कांदा घेऊन जालन्याकडे जाणारा दहा चाकी मालट्रक (क्रमांक एमएच 21 एक्स 299) गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने माणिकदौंडी घाटाच्या  धोकादायक वळणावर मालट्रक पलटी झाला. यामध्ये गाडीतील क्लीनर रवींद्र उर्फ रविराज खंडेभराड गाडीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात (Accident) घडल्यानंतर मयत रवींद्रला ट्रकखालून काढून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा  मृत्यू झाला. मयत रवींद्रचे वडील बप्पासाहेब खंडेभराड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ट्रकचालक संदिप दत्ता भडांगे याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  या अपघाताचा अधिक  तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश म्हस्के हे करीत आहे.

Web Title: Pathardi Accident One killed in truck overturn

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here