Home महाराष्ट्र 25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिसाला अटक

25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिसाला अटक

Sangali Crime: 25 हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

Police arrested for demanding bribe of 25 thousand

सांगली : बाल कामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. शेखर जयवंत पाटणकर (वय 42) असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळई बांधण्याचे काम कंत्राट घेतात. दि. 7 डिसेंबररोजी तक्रारदाराने कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकामावर एक अल्पवयीन बालक नातेवाईकास भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक व त्याचे नातेवाईक जखमी झाले. पोलिस कर्मचारी पाटणकर याने गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी तक्रार केली. पाटणकर याने 25 हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाटणकर याने लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याचे समोर आले होते. विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.

Web Title: Police arrested for demanding bribe of 25 thousand

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here