Home क्राईम 11 लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक आणि हवालदार अटकेत

11 लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक आणि हवालदार अटकेत

आरोपीला मदत करण्याच्या बदल्यात त्याच्याकडे 25 लाख रुपयांची लाच  (Bribe) मागणाऱ्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  अटक केल्याची कारवाई करण्यात आली आहे.

Police inspector and constable arrested while accepting bribe of 11 lakhs

मुंबई:  गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करण्याच्या बदल्यात त्याच्याकडे 25 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. अटक करण्यात आलेले पोलीस निरीक्षक भूषण दायमा आणि रमेश बतकळस पोलीस शिपाई दोघेही मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

काही दिवसांपूर्वी 7 जुलै रोजी पिडीत तक्रारदाराविरूद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भूषण दायमा करीत होते. या गुन्ह्यात तक्रारदारांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र न्यायाल्याने त्याचा जमीन नाकारला होता. त्यामुळे पोलीस निरीक्षक दायमा याने आरोपीला अटकेची भीती दाखवली. तसेच गुन्ह्यातील कारवाईचे स्वरूप कमी करण्यासाठी त्याच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सापळा रचून दोन लाख रुपये स्वीकारताना भूषण दायमा याच्यासह पोलीस शिपाई रमेश बतकळस याना रंगेहात पकडण्यात आले.

Web Title: Police inspector and constable arrested while accepting bribe of 11 lakhs

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here