राहुरीतील पोलीस अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले
Breaking News | Ahmednagar: १५ हजारांची लाच (Bribe) घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली.
राहुरी | Rahuri: राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असलेला दिनकर गर्जे हा १५ हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली.
एका शासकीय परवाना असलेल्या दारू विक्रेत्याला २० हजारांची लाच मागितली होती. १५ हजारांत तडजोड होऊन लाच स्विकारत असतानाच पथकाने गर्जे यास रंगेहाथ पकडले. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीसअधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये लाचलुचपत प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
राहुरी पोलिसांच्या लाचखोर भुमिकेमुळे पोलीस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कार्यवाही सुरू होती. एका शासकीय परवाना असलेल्या दारू विक्रेत्याकडे २० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीमध्ये १५ हजार देण्याचे ठरल्यानंतर संबंधित दारू दुकानदाराकडून लाच स्विकारताना सहाय्यक फौजदार गर्ने रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळाली आहे.
Web Title: Police officer in Rahuri caught red-handed while accepting bribe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study