Home महाराष्ट्र गुंगीचं औषध देऊन महिला पोलिसावर अत्याचार, वरिष्ठाने रुमवर नेलं अन्…

गुंगीचं औषध देऊन महिला पोलिसावर अत्याचार, वरिष्ठाने रुमवर नेलं अन्…

Breaking News | Mumbai Crime: एका महिला पोलिसावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Police officer sexual abused woman by giving her drug

पनवेल: नवी मुंबईच्या पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिला पोलिसावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यानं पीडितेला चहातून गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अश्लील फोटो काढल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहे.

महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी, नवी मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षकाविरोधात पनवेल पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसाची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात उपनिरीक्षकाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, , आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने मार्च २०२०मध्ये चहा पिण्याच्या बहाण्याने पीडितेला पनवेलमधील नेरे येथील आपल्या भावाच्या खोलीवर नेले होते. याठिकाणी आरोपीनं चहात गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी आरोपी पीडितेसोबत शरीरसंबंध ठेवतानाचे खासगी फोटो देखील काढले.

महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा. 

यानंतर आरोपीनं हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच लग्नाचे आमिष दाखवत पाच वर्षे लैंगिक अत्याचार केले. याशिवाय आक्षेपार्ह फोटो तिच्या मुलाला दाखवण्याची धमकी देऊन त्याने तिच्याकडून पाच लाख रुपये उकळले. या आरोपीने आणि त्याच्या आईने पीडितेला जातीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप देखील महिला पोलिसानं केला आहे. या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Breaking News: Police officer sexual abused woman by giving her drug

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here