धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Police APi Suicide Case: पोलीस उपनिरीक्षकाने मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
वसई विरार | नालासोपारा : अर्नाळा पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोळींज पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनसाठी विरारच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. बोळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
विरारच्या बोळींज परिसरातील साई ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रतीकांत भद्रेशेट्टे (३५) यांनी मंगळवारी दुपारी घरातील छताच्या हुकाला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्यात दीड वर्षाची मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आले नाही.
Web Title: Police sub-inspector commits suicide by hanging himself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study