Home नाशिक दरमहा पैसे घेणारा पोलिस उपनिरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात – Bribe Case

दरमहा पैसे घेणारा पोलिस उपनिरीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात – Bribe Case

Breaking News | Nashik Bribe Crime: तुझ्यावर कारवाई करतो’, असे धमकावत कॅफेचालकांकडून दरमहा तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक.

Bribe Case Police sub-inspector who takes money every month in the net of 'corruption'

नाशिक: ‘कॉलेज परिसरात कॅफे चालवून विद्यार्थ्यांना आडोसा करून देतो, तुझ्यावर कारवाई करतो’, असे धमकावत कॅफेचालकांकडून दरमहा तीन हजार रुपयांची लाच (Bribe) घेणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली. लाचखोर गोसावी हा आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत आहे.

तक्रारदार याचे शहरातील एका कॉलेजच्या परिसरामध्ये कॅफे आहे. याठिकाणी जोडप्यांना आडोसा मिळावा, यासाठी विभागणी केलेली होती. सहा महिन्यांपूर्वी लाचखोर गोसावी याने कॅफेचालकाची भेट घेत कारवाईचा दम देत त्याच्याकडून दरमहा दोन ते तीन हजार रुपये लाच घेत होता.

यामुळे त्रस्त झालेल्या कॅफेचालकाने गोसावी यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. संशयित गोसावी हा विशेष शाखेत कार्यरत असतानाही त्याने संबंध नसतानाही कॅफेचालकाकडे लाच मागितल्याचे उघड झाले. बुधवारी (ता. ६) तक्रारदार यांच्याकडून दोन हजार ५०० रुपये लाचची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस नाईक गणेश निंबाळकर, शिपाई नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Bribe Case Police sub-inspector who takes money every month in the net of ‘corruption’

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here