Home अहिल्यानगर पोलीस असल्याची बतावणी करत चार तरुणांनी ट्रकसह माल पळवून नेला

पोलीस असल्याची बतावणी करत चार तरुणांनी ट्रकसह माल पळवून नेला

Pretending to be police, four youths snatched truck

श्रीरामपूर: श्रीरामपूर येथून नगर येथे भंगार घेऊन जात असणाऱ्या ट्रक चालकाला मारहाण करत त्याच्याकडील ट्रक पळवून नेला. पोलीस असल्याची बतावणी करत आरोपींनी नगर मनमाड रोडवर हा ट्रक थांबविला होता.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात श्रीधर जंगलू सोनवणे वय ३४ रा. एकलहरे याने फिर्याद दाखल केली आहे. राहुरी विद्यापिठाजवळ त्यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच. २ एम ९४८२) भंगारा घेऊन जात असताना ही घटना घडली.

एका क्रमांक नसलेल्या कारमधून चार अनोळखी तरुणांनी पोलीस असल्याचे सांगत सोनवणे यांचा ट्रक थांबविला. त्यातील एका आरोपीने ट्रक नगरच्या दिशेने घेऊन जात फरार झाला. इतर आरोपींनी सोनवणे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना मुळा धरणाच्या परिसरात वरवंडी गावाच्या शिवारात निर्जनस्थळी नेऊन गाडीतून उतरवून दिले.

सोनवणे यांनी घडलेला सर्व प्रकार राहुरी पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्रक मध्ये १७०० किलोचे भंगार होते. जवळपास ५ लाख ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले. ट्रक कोणी व कशासाठी चोरून नेला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Pretending to be police, four youths snatched truck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here