लॉजमध्ये वेश्याव्यवसाय, महिलेची सुटका, हॉटेल मालकावर गुन्हा
Breaking News | Prostitution Business: अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर छापा टाकीत एका महिलेची सुटका.
इंदापूर: मदनवाडी (ता. इंदापूर) येथे अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर भिगवण पोलिसांनी शनिवारी (दि. ६) छापा टाकीत एका महिलेची सुटका केली. या वेळी पोलिसांनी हॉटेल चालक व मालक या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक मेहुल संदीप पाटील (रा. इंदिरानगर, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) व मालक मारुती भगवान बंडगर (मदनवाडी, ता. इंदापूर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. भिगवण-बारामती रस्त्यावरील यशराज हॉटेलमध्ये अवैधरीत्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून मोबाईल आणि रोख रक्कम मिळून, असा १६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, सचिन पवार, अंकुश माने, पोलीस हवालदार सारिका जाधव, कल्पना वाबळे यांच्यासह पोलीस पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Prostitution in lodges, emancipation of women
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study