Home अहमदनगर धक्कादायक: एकाच रात्रीत फोडले सात बंगले

धक्कादायक: एकाच रात्रीत फोडले सात बंगले

Rahata Theft Seven bungalows destroyed in one night

राहता | Rahata Theft:  जिल्ह्यात बऱ्याच  ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहे.  चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.  नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख रक्कमेसह एक लॅपटॉप चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवरानगर येथील प्रवरा डावा कॅनॉलच्याकडेला असणाऱ्या कारखाना परिसरातील ‘ए’ टाइप व ‘बी’ टाईप कॉलनी मधील सहा ते सात बंगल्यांची कडी व कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनीएकाच दिवशी घरातील कपाटाच्या उचकापाचक करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. चोरीच्या घटनेमुळे प्रवरानगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  चोरट्यांनी बंद असलेले बंगले फोडले असून चोरी झालेल्या रात्री बंगल्यात कुणीही नसल्यामुळे त्याचा फायदा घेत चोरट्यांनी पाळत ठेवून सहा ते सात बंगल्यात चोरी केली. सुट्टी असल्यामुळे तेथील अनेक जण गावी गेली असल्यामुळे हे बंगले फोडले.

वाचा: Ahmednagar News

पोलिसानी तातडीने चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Rahata Theft Seven bungalows destroyed in one night

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here